वर्धा : महान क्रांतिकारक बिरसा मुंडा हे सामाजिक जागरणाचे अग्रदूत होते असे प्रतिपादन महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरू प्रो. कृष्णकुमार सिंह यांनी केले. ते विश्वविद्यालयातील बिरसा मुंडा वस्तीगृहात शुक्रवार 15 नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कुलगुरू प्रो. सिंह व कुलसचिव प्रोफेसर आनन्द पाटील यांनी वस्तीगृहातील बिरसा मुंडा यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलतांना कुलगुरू प्रो. सिंह पुढे म्हणाले की बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमिनीच्या अधिकारासाठी जीवनभर संघर्ष केला व समाजाला आपल्या अधिकाराप्रती जागृत केले.
केवळ पंचवीस वर्षाच्या आयुष्यात त्यांनी सामाजिक जागरण करून साम्राज्यवादी शक्तीच्या विरुद्ध आवाज उठवला. प्रो. सिंह यांनी विद्यार्थ्यांना आग्रह केला की त्यांनी बिरसा मुंडा यांचे जीवन, संघर्ष व कार्य यापासून प्रेरणा घ्यावी. यावेळी कुलसचिव प्रो. आनन्द पाटील, डॉ. रामानुज अस्थाना व डॉ. जयंत उपाध्याय यांनीही बिरसा मुंडा यांचे जीवन व तत्वज्ञान यावर आपले विचार मांडले. तसेच विद्यार्थी सरोज चंदन, नीरज छिलवार, पुलोंग व पंकज कुमार यांनी कविता व भाषणाच्या माध्यमातून बिरसा मुंडा यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी दीपक कुमार यांनी केले तर बिरसा मुंडा वस्तीगृहाचे अधीक्षक डॉ. हेमचंद्र ससाने यांनी आभार मानले. कार्यक्रमानंतर कुलगुरू प्रो. सिंह व कुलसचिव प्रो. आनन्द पाटील यांनी वसतिगृहाचे भ्रमण केले व वसतिगृहात दिल्या जाणाऱ्या सुविधा तसेच समस्यांचे निरीक्षण केले. याप्रसंगी वसतिगृह अधीक्षक डॉ. प्रमोद जोशी, डॉ. सूर्य प्रकाश पांडे, डॉ. रणंजय कुमार सिंह, डॉ. प्रदीप, डॉ. श्रीनिकेत मिश्रा, बी एस मिरगे व सुधीर खरकटे यांच्यासह वस्तीगृहातील शोधार्थी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.