पवनारात कोटंबकर यांच्या रॅलीला नागरीकांचा प्रतिसाद ; वाढतोय मतदारांचा पाठिंबा : शेकडो कार्यकर्त्यांचा रॅलीत सहभाग

वर्धा : आपल्या लेखनीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळवून दिल्याने वर्धा-सेलू विधानसभा क्षेत्रात उमेदवारी दाखल केलेले साहसीक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रविन्द्र कोटंबकार यांना पवनार गावातील मतदारांचा प्रचंड पाठिंबा मिळाल्याचे चित्र दिसत आहे. त्यांच्या प्रचारार्थ गावातील बसस्थानक चौक, बाजार चौक, अण्णाभाऊ साठे चौक या भागात पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅलीत शेकडोच्या संखेने मतदार स्वयस्फुर्तीने सहभागी झाले होते.

यावेळी सामाजीक कार्यकर्ते विशाल नगराळे, बाजीराव हिवरे, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सावरकर, राधा कृष्ण मंडळाचे अध्यक्ष विनोद बोरकर, बंटी नगराळे, रणजित धोंगडे, संदीप पडघान, अनिल मुंगले, सोनू मुंगले, शेखर लोखंडे, नरेश कोराम, कैलाश लोखंडे, गुड्डू मुंगले, स्वप्निल मुगले, दीपक डोंगरे, अजय जाधव, गजानन मुगले, अशोक लोखंडे, शंकर मुगले, मंगला ऊराडे, मनीषा मुगले, इंदु मुगले, छाया चव्हाण, कुमुद साहू, रुचि कोराम, लक्ष्मी मुगले, शिलाबाई पडगान, प्रीती पडघान, सारिका खंदारे, आशा गायकवाड, गंगा तिघरे, वैष्णवी तिघारे, फैनिदा पठाण, सत्यभामा वैद्य, सपना संभरकर, गंगा बावनकर, निता ढोले, सुनीता थुल, अरुणा लोखंडे, मेघा टिघरे, अंजना तीघरे, रीना ढोमने, पूजा धोमणें, बेबी फुलसे, कामिनी घमंडी, कुणाल इरादा, गीतेश भागे, संकेत तिमांडे, शंकर राउत, अक्षय येरूनकर, बापू धान्दे, मनोज नानवटकर नंदा टूले यांच्यासह नागरीकांचा मोठा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here