वर्धा : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचार संहितेचे पालन करताना पोलिसांनी जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात अवैध दारू निर्मिती, विक्री व दारू वाहतुकीविरुद्ध केलेल्या कारवाईत देशी-विदेशी, गावठी दारू व साहित्यांसह एकाच दिवशी तब्बल 1 कोटी 42 लाख 4 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन व अपर पोलिस अधीक्षक डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व जिल्ह्यातील संबंधीत पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचार्यांनी केली. कारवाईत विविध दारू विक्रेते वाहतूक करणारे व दारू निर्माण करणार्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
Home ◼️ संपादकीय वर्ध्यात दीड कोटीचा अवैध दारुसाठा जप्त ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई