पवनार : मोठ्या प्रमाणात मूर्ती विसर्जन झाल्याने नदीपात्रात गाळ साचुन पाण्याचा प्रवाह थांबला त्यामुळे पाणी पुर्णपणे दुषित झालेले आहे. मूर्तींमध्ये असलेले तणस आणि माती यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. हे तणस जागच्याजागी सडल्याने यातून दुर्गंधी सुटायला लागली आहे. यामुळे धाम नदीचा श्वास गुदमरण्यास सुरवात झालेली आहे.
येथील स्थानीक ग्रामपंचायत प्रशासनाकडून काही दिवसापुर्वी या परिसरात स्वच्छाता मोहिम राबविली होती मात्र त्यांच्याकडे या कामाकरीता निधी नसल्याने त्यांनी केवळ वरवरचा कचरा काढून घेतला मात्र आजही या पात्रात कित्तेक ट्रक गाळ तसाच साचलेला आहे. याची सर्व जबाबदारी नरपरिषद विभागाकडे येते मात्र त्यांच्याकून आजपर्यंत कधीही या परिसराची स्वच्छता करण्यात आली नाही हे विषेश.
नदीपात्रात कृत्रीम विसर्जनकुंडाची व्यवस्था असतानाही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे यावर्षी मूर्ती थेट नदीपात्रात विसर्जीत करण्यात आल्याने हा पर्कार घडला आहे. गेल्या अनेक दिवसापासुन नदीपात्रात मूर्तींचा गाळ आणि तणस पडुन असल्याने ते जागीच सडले त्यामुळे या परीसरात दुर्गंधी पसरलेली आहे. धाम नदीपात्रात मोठ्या प्रमाणात घरघुती व सार्वजनिक गणेश मुर्तीचे विसर्जन झाल्साने धाम नदीपात्र पुर्णपने दुषित झालेला आहे.
या पात्रात मोठ्या प्रमाणात मुर्ती व निर्माल्य टाकल्या गेल्याने गाळ साचल्या गेला आहे. अनेक मूर्तींचे पाण्यात विघटण नसल्याने त्या तशाच अवस्तेत पडलेल्या आहे. यावर्षी एकाच ठिकाणी मुर्ती विसर्जन झाल्याने ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे परिसरात रोगरायी पसरण्याची भिती निर्माण झालेली आहे. मात्र असे असले तरी यावर कोनतीही उपाययोजना करण्यास जिल्हाप्रशासनाकडे वेळ नाही.