पवनार : हिंदु धर्मामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्सवाने साजरा केल्या जातो. यावेळी आतीशबाजी, फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केल्या जातो परंतू बाजारात विक्री करिता आलेल्या फटाक्यांवर देवी, देवतांचे चित्र लावलेले फटाके विक्रीस येतात फटाके फोडल्यानंतर कागदावर चिटकवलेले देवी-देवतांचे फोटो कचऱ्यात फेकल्या जोते त्यामुळे देवी देवतांची विटंबना होत. आणि हिंदु बांधवांच्या आस्थेला ठेच पोहोचत आहे म्हणून संबंधित व्यापाराकडे जर देवी-देवतांचे फोटो चिपकवलेले फटाके आढळत असेल तर त्यांच्यात कायदेशीर कारवाई करावी असे निवेदन बजरंग दलाच्या वतीने सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनीत घांगे यांना देण्यात आले. यावेळी बजरंग दलचे जिल्हा संयोजक महेश (बबलू) राऊत, पंकज नेहारे, गणेश खेलकर, विशाल हीवरे यंची उपस्थिती होती
Home ◼️ संपादकीय देवी-देवतांचे चित्र लावलेले फटाके विक्री बंद करा ! विक्रेत्यावर कायदेशीर कारवाई करा