हिंदी विवित वाद-विवाद व प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्‍न ; वेदिका, विवेक, देवब्रत, शिवम, हरदेव व खुशाल झाले पुरस्‍कृत

वर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालयात पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, वर्धा यांच्‍या वतीने दक्षता जागरुकता सप्ताह अंतर्गत ‘सत्‍यनिष्‍ठा की संस्‍कृति से राष्‍ट्र की समृद्धि’ या विषयावर वादविवाद स्पर्धा आणि ‘भ्रष्टाचार निरोधक/सामान्य जागरूकता’ या विषयावर प्रश्नमंजुषा स्पर्धा बुधवारी 23 ऑक्‍टोबर रोजी महादेवी वर्मा सभागृहात आयोजित करण्यात आली. वादविवाद स्पर्धेमध्‍ये जनसंचार विभागाची वेदिका मिश्रा प्रथम, विवेक रंजन सिंह द्वितीय व शिक्षा विभागाचे देवब्रत दुबे यांना तृतीय पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला.

प्रश्नमंजुषा स्पर्धेत हिंदी साहित्‍य विभागाचे शिवम अग्रहरी प्रथम, हरदेव सिंह राजपूत द्वितीय व खुशाल सिंह यांना तृतीय पुरस्‍कार प्रदान करण्‍यात आला. वादविवाद स्पर्धेचे संयोजक तुलनात्‍मक साहित्य विभागाचे असोशिएट प्रोफेसर डॉ. रामानुज अस्थाना, सह-संयोजक संस्कृत विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. जगदीश नारायण तिवारी व सदस्य सचिव, सहायक क्षेत्रीय निदेशक डॉ. प्रकाश नारायण त्रिपाठी आणि प्रश्नोत्तर स्पर्धेचे संयोजक दर्शन आणि संस्कृती विभागाचे असोशिएट प्रोफेसर डॉ. जयंत उपाध्याय, प्रदर्शनकारी कला विभागाची सहायक प्रोफेसर डॉ. विधु खरे दास, संस्‍कृत विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. प्रदीप होते. या प्रसंगी पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे श्रीपाद कोलटे, पदम वाकोडीकर व विविचे जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here