

वर्धा : ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाकघरातील किराणा मालाच्या वस्तूंनी महागाईचा कळस गाठला आहे. डाळी, तेलांच्या दरात गेल्या महिन्याच्या तुलनेत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेल, शेंगदाणे, चणाडाळ यांच्या दरवाढीने गृहिणींचे बजेट कोलमडले असून, ऐन सणासुदीच्या काळात वाढत्या महागाईने चिंता वाढली आहे.