समुद्रपूर : शिवसैनिकांनी शिवसेनेची गरिमा साबित राखण्यासाठी एकनिष्ठता कायम ठेवली आहे. यात जेष्ठ कार्यकर्त्यांनी शंका मानू नये. आम्ही शिवसेना पक्ष बांधणी आणि उभारणीत पुढाकार घेऊ यासाठी जेष्ठ कार्यकर्त्यांनी मार्गदर्शन करावे अशी भावना सावंगी (झाडे) येथील शिवसैनिकांनी व्यक्त केली.
उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जेष्ठ नेते सीताराम भुते यांच्या उपस्थितीत सावंगी झाडे येथे कार्यकर्ता भेट व संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जेष्ठ शिवसैनिक सीताराम भुते यांचा सन्मान माऊली दुर्गा मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी युवा सेनेचे उपतालुका प्रमुख संजय खोंडे यांच्यासह स्थानीय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी जेष्ठ शिवसैनिक सीताराम भुते यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागावे. अश्या सूचना केल्या. कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याकडून देण्यात येणाऱ्या भुलथापाकडे लक्ष न देता पक्षाशी समरस होऊन एकनिष्ठेने पक्षांचे काम करावे असे आवाहन केले.
यावेळी निलेश कठाणे, अतुल झाडे, गणेश वैद्य, मिथुन झाडे, प्रणित कटाने, तुषार नेवारे, कृष्णा बनोटे, सागर कठाने, नितीन डहाट, संदीप धोटे, आशिष चणेकर, प्रवीण उसरे, आशिष झाडे, रोशन कठाणे, ईश्वर कठाणे, सागर मानकर, कृष्णा धोटे, समीर झाडे, प्रीतम मानकर, तेजस चनेकार, दिनेश डहाट, निखिल डहाट, कार्तिक कठाणे, गणेश टेकाम, राहुल टेकाम, ऋतिक टेकाम, रोहित सोनवणे, अरविंद भोयर, राहुल किरणापुरे, बादल कावळे, करण कावडे, महेश देवतळे, समीर सराटे, प्रज्वल सराटे, मयूर ठाकरे, सचिन नवले, नयन देवतळे, सुरेश मांडवकर, शुभम कठाणेयांची उपस्थिती होती.