पवनार : हजारो मूर्तींचे विसर्जन होत असल्याने येथील धाम नदीपात्र प्रदुषित होत होते. यावर पर्याय म्हणून लाखो रुपयांचा खर्च करुन नदिपात्रालगत कृत्रिम विसर्जकुंड तयार करण्यात आला. मात्र गणेश मूर्तींच्या विसर्जनास उद्यापासून सुरवात होणार असताना प्रशासनाने अद्याप मूर्ती विसर्जनाची कोणतीच तयारी केलेली नाही. त्यामूळे उद्यापासून थेट नदिपात्रात मूर्ती विसर्जीत होवुन काही प्रमाणात नदीचे प्रदुषण होणार आहे.
दरवर्षी मूर्ती विसर्जन होणार असल्याचे माहित असतानाही जिल्हा प्रशासनाकडून विसर्जानाची कोणतीच पूर्वतयारी करण्यात येत नसल्याने याबाबत पर्यावरणप्रेमी आश्चर्य व्यकत करीत आहे. काही दिवसावर मूर्ती विसर्जनाला सूरवात होणार असले तरी धाम नदीपरिसरात असलेल्या विसर्जनकुंडात मागीलवर्षी मूर्ती विसर्जन करण्यात आलेला गाळ अद्यापही त्याच अवस्थेत पडून आहे. काही प्रमाणात त्यात पाणी साचलेले आहे. प्रशासनाच्या या उदासीन धोरणामूळे विसर्जनाच्या दृष्टिकोणातून अद्याप कोणतीच उपाययोजना झालेली नाही.
प्रशासनाकडून चालढकलपणा चालू असल्याने हा प्रकार घडत असल्याचा आरोप होत आहे. नदी प्रदुषनाचे प्रशासनाला काहिही देनेघेने नाही असाच यातून दिसून येत आहे. विसर्जनाकरीता विसर्जनकुंड तयार असतानाही त्यातून गमागील वर्षीचा गाळ काढून तो स्वच्छ करुन त्यात नदिपात्रातून पाणी भरण्याचा विसर प्रशासनाला का पडतो हा मोठा संशोधनाचा विषय आहे.
दरवर्षी असाच प्रकार…
काही भाविकांकडे दिड दिवसाचा गणपतीची स्थापना केली जाते. त्यानंतर भाविक मूर्ती विसर्जनाकरीता पवनार येथे आणत गणरायाला निरोप देत मूर्ती विसर्जीत करतात. विसर्जनकुंडात मूर्ती विसर्जनाची प्रशासनाकडून कूठलीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामूळे गणेशभक्तांना थेट धाम नदीपात्रातच मूर्ती विसर्जन करावे लागेल. त्यामूळे काही प्रमाणात धाम नदीचे प्रदूषण झाले होते. जिल्हा प्रशासनाच्या उदासीन धोरणामूळेच हा प्रकार घडत आहे.