पवनार : शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सिमेंट कॉग्रेटचे जंगल तयार झाले आहे. त्याकरीता बेसूमार वृक्षांची कत्तल झाली मात्र त्या प्रमाणात वृक्षलागवड झाली नाही. वृक्ष नसतील तर पृथ्वीच्या अस्तित्वाला धोका निर्माण होईल, वृक्षांशिवाय माणवी जीवणाला अस्तित्व नाही असे विचार वर्धा श्रमीक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रविण धोपटे यांनी व्यक्त केले. तपोवन’ बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने नागटेकडी परिसरात आयोजीत वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषि विभाग कर्मचारी पथसंस्थेचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रशांत भोयर, डॉ. पुरुषोत्तम खोब्रागडे, गुरुकूल अकॅडमीचे संचालक शैलेश राऊत, मुख्याध्यापक अमोल भोयर, माजी सरपंच अजय गांडोळे, सामाजीक कार्यकर्ते नितीन कवाडे, श्रीकांत तोटे, जयंत गोमासे याची प्रमुख उपस्थिती होती.
दरवर्षी तपोवन’ बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून पवनार येथील नागटेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात वृक्षारोपण करुन त्यांची निगा राखण्याचे काम करण्यात येत आहे. या कामाकरीता अनेक दाणदाते संस्थेला मदत करीत आहे. रोख रकम, ट्रिगार्ड, वृक्ष भेट देवून दाणदाते संस्थेला मदत करीत असल्याने हा उपक्रम चालू असल्याचे यावेळी संस्थेचे अध्यक्ष राहुल खोब्रागडे यांनी सांगीतले. वृक्षारोपणाकरीता दत्ताजी मेघे कुलपती, दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थान सावंगी मेघे यांच्याकडून संस्थेला १० हजार रुपये रोख रक्कम मिळाली. पवनार येथील सामाजीक कार्यकर्ते सतीश कोसे यांच्याकडून २ ट्रिगार्ड, यूवा उद्योजक वैभव उमाटे यांच्याकडून २ ट्रिगार्ड, हॉटेल प्लाझाचे संचालक विजय वाघमारे यांच्याकडून १ हजार रोख, ग्रामपंचायत पवनारचे माजी सदस्य मनिष ठाकरे यांच्याकडून १ हजार रोख स्वरुपात संस्थेला मिळाले. यांच्यासह अनेक दानदाते आणि कार्यकर्त्यांनी श्रमदान करुन संस्थेला सहकार्य केले.
यावेळी अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे विषेश सहकार्य संस्थेला मिळाले. कार्यक्रमाला संगीता धाकतोड, सायली आदमने, संस्थेचे सदस्य गणेश मसराम, नरेश बावणे, राहुल काशीकर, मिथून कवाडे, लवेश भूजाडे, नरेश कोराम, रमेश धोंगडे, श्याम बोरघरे याची उपस्थिती होती.