विद्यार्थ्यांना शालेय साहित्त्याचे वाटप ; रोटरी क्लब साऊथ ईस्टचे आयोजन

कारंजा (घा) : नागपूर येथील रोटरी क्लब साऊथ इस्ट वतीने तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय साहित्त्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील एकार्जून, बोंदरठाणा, सावळी, राजनी येथील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये रोटरी क्लब तर्फ विविध शालेय साहित्त्याचे विद्यार्थ्यांना वाटप केले. यामध्ये नोटबुक, टिफीन बॉक्स, बॉटल, स्कूल बॅग,कंपास बॉक्स आदी शालेय साहित्त्याचे समावेश आहे, जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष विजय बाजारे, पंचायत समितीचे माजी सभापती मेघराज चौधरी, आष्टी पंचायत समितीचे माजी सभापती अरुण बाजारे, संजय खंडार, गिरीश पारधी, अरुण वासुलकर, टिकाराम चौधरी, संजय सातपूरे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here