शिक्षणाला महत्व द्याल तरच समाज पूढे जाईल : नितेश कराळे ; पवनारात अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात

पवनार : दलीतांचा संघर्ष आपल्या लेखणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडण्याच काम अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यावेळच्या परिस्थितीमुळे अण्णाभाऊंना शिक्षणापासून वंचीत राहावे लागले मात्र आता शिक्षणाची दारे खुली असतानाही आपला समाज मात्र शिक्षणाला महत्व देत नाही. दोन-चार वर्ग शिकले की शाळा सोडून आपल्या पारंपारीक व्यवसायाच्या मागे लागतात हे समाजाचे दुर्भाग्य आहे. त्यामुळे जोपर्यंत शिक्षणाला महत्व देणार नाही तोपर्यंत समाज पूढे जाणार नाही. असे विचार फिनीक्स अकॅडमीचे संचालक नितेश कराळे यांनी व्यक्त केले. पवनार येथे आयोजीत अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. पंकज भोयर, संपादक रविन्द्र कोटंबकर, सेवाग्राम पोसिस स्टेशनचे ठाणेदार विनीत घागे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, जामणी साखर कारखाण्याचे संचालक निर्गुनजी खैरकर, सामाजीक कार्यकर्ते सुनील बुरांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पूढे बोलताना श्री कराळे म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाला एससी प्रवर्गात समावीष्ट करुण घेतले मात्र त्यातला एक समाज शिक्षणाने पूढे गेला आणि मातंग समाज त्या तुलनेत आजही त्याच ठिकाणी आहे. आजही आमची परिस्थीती बदललेली नाही आमची पोर आजही खुळखुळा वाजवण्याचेच काम करतात. त्यामुळे आता आपले पारंपारीक व्यवसाय दुर ठेवत आपल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कस आणता येईल याकडे लक्ष द्याल तरच समाजाची प्रगती होवू शकते.

यावेळी बोलताना आमदार डॉ. पंकज भोयर म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी जे साहित्य लिहून ठेवल ते त्यांच प्रबोधन संपूर्ण महाराष्ट्रात सतत स्मरणात राहव आणि येणाऱ्या पिढीला लोकशार अण्णाभाऊ साठे याची माहिती व्हावी याकरीता आपण त्यांची जयंती मोठ्या उत्साहाक साजरी करतो. याठिकाणी असलेल्या पुतळ्याल्या छत्री बसविण्याचे काम येत्या दीड महिन्यात करु तसेच ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करुण दिल्यास अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने गावात अंभ्यासीका तयार करुण देवू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

जयंतीची पहिल्यांदाच भव्य मिरवणूक…

गावातून पहिल्यांदाच भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. आयोजन कमीटीने याकरीता मोठे परिश्रम घेतले ढोल, ताशे, बॅन्ड, बग्गी, नृत्य, झाकी, लायटींग, माहापुरुषांची वेषभूषा या मिरवणूकीचे आकर्षण ठरली. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण गावातून बुद्ध विहारापर्यंत मिरवणूक वाजत गाजत आली. गावातील हजारोंच्या संखेने नागरीकांनी या मिरवणूकीत सहभाग घेतला होता.

यावेळी वरुडच्या सरपंच सुनीता ढवळे, माजी सरपंच अजय गांडोळे, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, सामाजीक कार्यकर्ते नितीन कवाडे, भिम टायगर सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विशाल नगराळे, श्रीकांत तोटे, सतीश अवचट, गणेश तिमांडे, राणीताई धाकतोड, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष रंजीत धोंगडे, गोविंद वानखेडे, विजय बेंडे, नरेश मुंगले, दिपक गवळी, संदिप पडघान, जिवन गवळी, संजय गायकवाड, मंगेश बावणे, शंकर गायकवाड, नरेश वानखेडे, मंगेश वानखेडे, विठ्ठल पडघान, सचिन वानखेडे, जय मुंगले, प्रविण वानखेडे, चंद्रशेखर लोखंडे, सतीश मुंगले, दिपक डोंगरे, कैलास लोखंडे, संजय हिवराळे, अनिकेत मुंगले, वैष्णव गायकवाड, शुभम पडघांन, साहिल मुंगले, पवन आमटे, आकाश डोके, प्रदिप आमटे, राकेश मुंगले, नरेश कोराम, लक्षमण खंगार यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here