पवनार : गेल्या अनेक वर्षापासून नागटेकडीकडे जाणाऱ्या रसत्याची दुरावस्था झाली होली होती. या ठिकाणावरुन पायदळ चालनेही कठीण झाले होते. ही बाब तपोवन बहुउद्देशीय संस्थेने लक्षात आनून देताच पवनार येथील सामाजीक कार्यकर्ते सागर थूल यांनी स्वखर्चातून आपल्या जोसीबी मशीनने टेकडीरुन मंदीरापर्यंत जाणारा रस्ता तयार करुण दिला. त्यामुळे सागर थूल यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
पवनार येथून दोन किलोमीटर अंतरावर नागटेकडी आहे. टेकडीवर एक पुरातन नागमंदिर आहे. येथे भावीक मोठ्या श्रद्धेने येतात. नागपंचमीला हजोरोंच्या संखेने भावीक या ठिकाणी येतात मात्र मंदीरापर्यंत जाण्याकरीता रस्ता नसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. हे मंदिर गावाच्या बाहेर आल्याने या नागटेकडीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याठीकाणी मंदीरात जाण्यासाठी साधा रस्ताही नाही.
या परिसरालगत पवनार, कान्हापूर, मोर्चापूर, गोंदापूर, सुरगाव तसेच येथील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी आहेत. शेतात जाण्याकरीता त्यांना याच रस्त्याचा वापर करावा लागतो मात्र बैलगाडी किंवा दुचाकी घेवून जाता येत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. हीच बाब लक्षात घेत येथील सामाजीक कार्यकर्ते सागर थूल यांनी हा रस्ता तयार करीत शेतकरी तसेच येणाऱ्या भावीकांची अडचण दूर केली. त्यामुळे शेतकरी आणि भाविकांनी समाधान व्यक्त करीत सागरचे कौतूक होत आहे.