डेंग्यूचा डंख! एकाच महिन्यात चार रुग्ण

पवनार : या गावात डेंग्यूची साथ चांगलीच पाय पसरायला लागल्याचे दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरात गावात डेंग्यूसदूश आजाराचे चार रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये दोन तर वॉर्ड क्रमांक 3 मध्ये एक व वॉर्ड क्रमांक 5 एक रुग्ण आढळून आला आहे. याशिवाय गावात अनेक रुग्ण तापाने फणफणत आहे.

वॉर्ड क्रमांक 1 मध्ये डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यासाठी पोषक वातावरण असल्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. इंगळे यांनी सांगितले. डासांचे निर्मूलल करण्यासाठी ग्रामपंचायतला फवारणी व धुरळणी करण्याचा सूचना प्राथमिक उपकेंद्राच्यावतीने देण्यात आल्या. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाकडून अजूनकुठलीही उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून येत नाही. वेळीच उपाययोजना न झाल्यासयाचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. आरोग्य उपकेंद्राच्यावतीने गावात, तपासणी मोहीम राबविली जात असून, संशयित रुग्ण आढळल्यास त्यास ताबडतोब सरकारी रूणालयात दाखल केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here