वर्धा जिल्हा पगारदार कर्मचारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध! प्रशांत भोयर अध्यक्ष, सचिवपदी नितीन तराळे यांची वर्णी

वर्धा : जिल्ह्यातील पतसंस्थांच्या विविध अडचणी व समस्यांना वाचा फोडून शासन दरबारी न्याय मिळावा, याकरिता पगारदार कर्मचारी पतसंस्था संघाची स्थापना करण्यात आली. यावर्षी सर्व संचालक मंडळाची जलसंपदा कर्मचारी सहकारी पतसंस्था कार्यालयात बिनविरोध निवड झाली. या निवडणुकीत अध्यक्षपदी कृषी विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भोयर यांची एकमताने निवड झाली, तर उपाध्यक्षपदी नंदकुमार मार वरकड व सचिवपदी नितीन यांची निवड करण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व पगारदार कर्मचारी पतसंस्था यांचा संघ ओंकार धावडे यांच्या पुढाकाराने स्थापन झाला. यात सर्व सरकारी विभागांतील पतसंस्थांचे सभासद असतात. यावर्षी सर्व संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली. ओंकार धावडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक प्रक्रिया पूर्ण झाली. यावेळी संचालक चंद्रकांत ठाकरे, राजू राजूरकर, दिलीप उपासे, राजेश राऊत, रुपेश नागरे, दिलीप नगराळे उपस्थित होते. वडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. याप्रसंगी ओंकार धावडे, बिकास अधिकारी सोनुरकर, कृषी विभाग कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे सचिव मोईन शेख, व्यवस्थापक सुनी देवलकर, राम बावकर, हर्षल, जांबुवंत मडावी, कृषी विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्थेचे संचालक व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रशांत भोयर यांचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here