जास्तीतजास्त वृक्षलागवड करने काळाची गरज! ठाणेदार विनीत घागे; ‘तपोवन’ बहुउद्देशिय संस्थेचा उपक्रम

पवनार : वृक्षारोपण करने ही काळाजी गरज आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभाग घेत जास्तीतजास्त वृक्षलागवड करीत त्याचे संगोपण केले पाहिजे, ‘तपोवन’ बहुउद्देशिय संस्थेकडून राबविण्यात येणारा हा उपक्रम प्रेरणादायी आहे. असे प्रतिपादन सेवाग्राम पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनित घागे यांनी केले. ‘तपोवन’ बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने पवनार येथील बसस्थानक परिसरात आयोजीत वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी सरपंच अजय गांडोळे, माजी उपसरपंच राहुल पाटणकर, माजी पंचायत समिती सदस्य, प्रमोद लाडे, कृषी विभाग कर्मचारी पथसंस्थेचे अध्यक्ष प्रशांत भोयर, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, मुख्याध्यापक अमोल भोयर, पोलिस उपनिरीक्षक प्रभाकर उईके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

मागील काही वर्षात बेसूमार वृक्षतोड झाली परिणामी तापमाणात प्रचंड वाढ होत चाललेली आहे. पक्षांचा अधिवास नष्ट झाल्याने त्यांची संख्या कमी झालेली आहे याचा निसर्गसाखळीवर परिणाम होत चाललेला आहे. निसर्गाचा समतोल राखण्याकरीता वृक्षलावड करने गरजेचे झाले आहे. ही बाब लक्षात घेत ‘तपोवन’ बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्थेचा वतीने दरवर्षी वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमात अनेक सामाजीक कार्यकर्ते, राजकीय नेते, दाणदाते सहभाग घेतात. सर्वच स्थरातून संस्थेच्या या उपक्रमाला मदत होते. या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम अविरत चालू राहिल असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष राहुल खोब्रागडे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष सतीश अवचट, सामाजीक कार्यकर्ते श्रीकांत तोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य मुनेश्वर ठाकरे, आरटीओ कार्यालयाचे सचीन घानमोडे, सतीश कोसे, नरेश बावणे, नितेश अवचट, वासुदेव खोब्रागडे, अभय शंभरकर, सागर थूल, पोलिस कर्मचारी नितीन राजपूत, संस्थेचे सदस्य गणेश मसराम, यांच्यासह नागरीकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here