क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का, म्हणत व्यक्तीस पावणेतीन लाखांनी गंडा! सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वर्धा : क्रेडिट कार्ड बंद करायचे का, असे म्हणत मोबाईल अँप्स इन्स्टॉल करण्यास सांगून व्यक्‍तीच्या खात्यातून वेळोवेळी परस्पर पैसे काढत जवळपास २ लाख ८७ हजार 3०० रुपयांची रक्‍कम काढून घेत गंडा घातला. ही घटना देवळी शहरात घडली. याप्रकरणी व्यक्‍तीने थेट सायबर पोलिस स्टेशन गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तक्रारीवरुन अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

मधुकर हरिभाऊ खाडे (४७ रा.देवळी) हे घरी असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताचा फोन आला आणि क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे का, अशी विचारणा केली. मधुकरने त्याला प्रतिसाद दिल्याने आरोपी भामट्यांने मधुकरला झोहो नामक अँप्स इन्स्टॉल करण्यास सांगून त्यानंतर मोबाईलमधील योनो अँप्समधून एटीएम कार्ड ऑर्डर करायला लावले. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर मधुकरच्या बँक खात्यातून आठवेळा परस्पर व्यवहार झाले. या व्यवहारातून जवळपास २ लाख ८७ हजार 3०० रुपयांची परस्पर कपात झाल्याने अज्ञाताने फसवणूक केल्याचे लक्षात येताच मधुकरने थेट सायबर ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here