वर्धा : माझा चालक तुझ्या ट्रॅक्टरवर का ठेवला, असा प्रश्न पहिल्या ट्रॅक्टर मालकाने विचारला, या वादातून दुसऱ्या ट्रॅक्टर मालकान पहिल्याला मारहाण केली. जखमी दुसऱ्या ट्रॅक्टर मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. ही. घटना आर्वी तालुक्यातील पिंपळगाव ते सालफळ रस्त्यावर घडली. पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत ११ मे रोजी आरोपीस बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्याला १४ मे पर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. योगेश साहेबराव काटकर (४५, रा. जगुंनखेडा) असे मृताचे, तर तर ललित हेमंत इंगळे (४१, रा. गांधीनगर पुलगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
मृतक योगेश काटकर आणि आरोपी ललित इंगळे हे दोघेही वाळू विक्रीचा व्यवसाय करायचे, असे सांगितले जाते. मृतक योगेशच्या ट्रॅक्टरस्वरील चालकाला ललितने स्वत:च्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून ठेवले होते. ही बाब योगेशच्या लक्षात येताच त्याने ट्रॅक्टर चालकाशी वाद घातला. याची माहिती ललितला मिळताच त्याने पिंपळगाव ते सालफळ रस्त्यावर असलेल्या एका शेताजवळ योगेशला रस्त्यात अडविले. त्याला फावड्याच्या दांड्याने जबर मारहाण केली. यात योगेश काटकर गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना सावंगी येथील रु्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याचा १० मे रोजी दुपारच्या सुमारास मृत्यू झाला. मृुतकाचा भाचा चंद्रकांत गजानन सुरोसे (रा. गुंजखेडा) याने पुलगाव पोलिसात तक्रार दाखल केली होती.