आष्टी (शहीद) : नवीन आष्टी पुनर्वसन कॉलनी परिसरात भाडयाच्या घरात राहणाऱ्या पार्डी तालुका कारंजा (घा.) येथील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर ऊर्फ गुड नामदेव ढबाले याने त्याचा मोठा भाऊ नामदेव ढबाले (40) याची काठी व दगडाने मारहाण करून हत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 16) सकाळी 10 वाजताच्या सुमारास नबीन आष्टी येथील पुनर्वसन कॉलनीत घडली.
कारंजा (घा. ) तालुक्यातील पार्डी नामदेव ढबाले यांना दोन मुले असून मोठा मुलगा पार्डी गावात राहतो, तर लहान मुलगाबिवाहित आहे. लहान मुलाच्या वाट्यालाशेती तर मोठ्या मुलाला घर देण्यात आले आहे. शेतीचा हिस्सा दिला नाही म्हणून मोठा मुलगा किशोर हा लहान भाऊ ज्ञानेश्वर उर्फ गुडू यांच्याकडे शेती नावावर करून देण्याचा तगादा लावत होता. ज्ञानेश्वर उर्फ गुडु हा आई-वडिलांना घेऊन नवीन आष्टी येथील पुनर्वसन कॉलनीत राहायला आला. मंगळवारी (दि. 16) सकाळी किशोर ढबाले हा आष्टीत ज्ञानेश्वरच्या घरी पोहोचला. त्याने शेतीचा सातबारा माझ्या नावाने करून दे असे त्याच्या भावाला म्हटले. शिवाय आई सोबत वाद करून मारहाण केली. शिवाय मालवाहू वाहनाच्या काचा फोडल्या. अशातच संतापलेल्या ज्ञानेश्वरने किशोर याला मारहाण करून ठार केले. या प्रकरणी आष्टी पोलिसांनी हत्येच्या कलमान्वये गुन्ह्याची नोंद घेतली आहे.