वर्धा : मागील काही दिवसापासून वर्ध्यातील मार्केट लाईन मधील दुकाने फोडण्याचा प्रकार सुरू होता व चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला होता व चोरटे चोरी केल्या नंतर फुटेज मिळु नये म्हणून दुकानातील कॅमेरा चे डीव्हीआर सेट चोरून सोबत घेऊन जात असत. यामुळे त्यांना शोधणे अजून आव्हानात्मक झाले होते वरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने या चोरीस आळा घालण्यासाठी रात्र गस्त व चोरी दरम्यान संशीत ईसमावर पाळत ठेऊन त्यांचे बाबत सविस्तर माहिती मिळवली असता मिळालेले विश्वसनीय माहितीवरून आरोपी राजा याला नागपूर वरून ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार देवाशिस सरकार रा. संतीपूर वेस्ट बंगाल याचे सोबत मार्केट लाईन मधील आठ दुकाने व एक घर फोडल्याची कबुली दिली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नूरल हसन साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवडे यांचे आदेशान्वये पो नी. संजय गायकवाड स्था गु शा. वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि सलाम कुरेशी, अमोल लगड, पो.हवा नरेंद्र पराशर, अमरदीप पाटिल, नितीन इटकरे, संघसेन कांबळे, मिथून जिचकार, अनुप कावळे, अंकित जिभे सर्व स्था.गु. शा. वर्धा यांनी केली.