आर्वी : आनंद काळेच्या घटनेत साक्षीदार का होता, असे म्हणत आठ ते दहा युक््कांनी डेकोरेशन व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करुन चाकूने सपासप वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना २६ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास महालक्ष्मी लॉन परिसरात घडली. या घटनेने चांगलीच खळबळ माजली. जखमीला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने वर्धा येथील रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शंकर प्रकाश वाघमारे (3५, रा. गुरुनानक धर्मशाळा परिसर) असे जखमी व्यक्तींचे नाव आहे. आवी ते वर्धा मार्गावर असलेल्या महालक्ष्मी लॉनमध्ये डेकोरेशनचे काम सुरु होते. शंकर वाघमारे हा देखील तेथे होता. दरम्यान, त्याला एकाचा फोन आला आणि तुम्ही कोठे आहे, असे सांगत तुम्हाला काम द्यावचे असल्याने भेटायचे आहे, असे बोलला. शेंकरने त्याला लॉनकडे येण्यास सांगितले, दुपारी १.३० वाजेच्या सुमारास सात ते आठ युवक तेथे आले आणि शंकरशी वाद करुन त्यातील एकाने धारदार शस्त्र काढून छाती, डाव्या पायाच्या मांडीवर सपासप वार करुन जिवेमारण्याचा प्रयत्न केला. शंकरला रक्ताच्या थारोळ्यात सोडून तेथून पळ काढला. दोन दिवसांपूर्वी आनंद काळे याच्यासोबत आरोपी खुशाल कोहली, सौरभ भुजाडे, दाहीर यांनी वाद करीत मारहाण केली होती. यात साक्षीदार म्हणून शंकर वाघमारे याचे नाव होते. याच कारणाचा वचपा काढून खुशाल कोहली, सौरभ भुजाडे, दाहीर, शिख मुलगा, आकाश माने, सुरेश डोंगरे, धनु जयदेव, मयूर श्रीपाले, धीरज धानकी यांनी जीवघेणा हल्ला चढवला. याप्रकरणी गुन्हा दाखल केला.