वर्धा : कंपनीचे शेअर्स खरेदी केल्यास सूट मिळेल, असे प्रलोभन देत तरुणाकडून तब्बल १३ लाख पाच हजार रुपये गुंतवणुकीच्या नावावर घेत त्याची ऑनलाइन फसवणूक केली. ही घटना हिंगणघाट शहरात उघडकीस आली. याप्रकरणी १९ रोजी रात्री उशिरा पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हिंगणघाट येथील रहिवासी दैवाशिष कमलकुमार पटेल (२९ हा इन्स्टाग्राम आयडीवर स्टॉक्समध्ये गुंतवणूक करण्याबाबतची माहिती पाहत असताना त्याला एका ग्रुपमध्ये मेसेज दिसला. त्यावरून त्याने व्हॉट्सअप ग्रुप जोंडन केला. त्या ग्रुपमध्ये शेअर्स खरेदी केल्यास १० ते १२ टक्के सूट मिळेल, असे सांगून विविध प्रलोभने दिली. प्रलोभनाला भुलून देवाशिषने आरोपी भामट्याच्या विविध खात्यांमध्ये १३ लाख पाच हजार रुपये टाकले. पैसे देऊनही कोणत्याही प्रकारचे शेअर्स न मिळाल्याने त्याची १३ लाख रुपयांनी ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात आले.