वर्धा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू झाली आहे. अशातच पोलिस विभाग दारूविक्रेत्यांच्या मुसक्या बांधण्यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत 5 लाख ९४ हजार ७१० रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला तर २७ आरोपींविरुद्ध विविध ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. ही कारवाई १७ रोजी जिल्हा पोलिस दलाकडून संयुक्तरित्या करण्यात आली.
पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी दारूविक्रेत्यांवर कारवाई करीत दारूसाठा जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अशातच १७ रोजी जिल्ह्यातील १९ पोलिस ठाण्याच्या हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये राबविण्यात आलेल्या मोहिमेत दारूविक्री तसेच वाहतूक करणाऱ्यांविरोधात २७ प्रकरण दाखल करून २७ दारूविक्रेत्यांविरुद्ध मुन्हे दाखल करण्यात आले. ही मोहीम एकत्रितरित्या वर्धा जिल्हा पोलिसांकडून राबविण्यात आली असून निरंतर सुरु राहणार आहे.