
पवनार : आचार्य विनोबा भावे यांची कर्मभूमी असलेल्या पवनार गावात दारुबंदीसाठी सेवाग्राम पोलिसांकडून विषेश मोहिम राबविण्यात येत आहे. याबाबत ठाणेदार विनीत घागे यांनी वारंवार दारुविक्रेत्यांना दारुविक्री बंद करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीही दारुविक्री सुरुच ठेवणाऱ्या दारुविक्रेत्यांवर आता कठोर कारवायी करण्यास सुरवात केला आहे. दारुविक्री करताना आढळून आल्यास आता सेवाग्राम पोलिसांकडून दारुविक्रेत्यांची दारुची डबकी डोक्यावर देत चौकापर्यंत वरात काढण्यात येत असल्याने दारुविक्रेत्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
ठाणेदार विनीत घागे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पाहिले पवनार येथील दारुबंदी कशी करता येईल याकडे विषेश लक्ष देवून गावातील दारु बंद करण्याकरीता नागरीकांना सहकार्य करण्याचे आवाहन कले होते. त्यामुळे दारुविक्री करताना दिसताच ठाणेदारांना नागरीकांकडून माहिती दिल्या जाते माहिती मिळताच थेट कारवायी करण्यात येत असल्याने काही दिवसापूर्वी खुलेआम चालू असनारी दारुविक्री आता पूर्णपणे बंद झालेली आहे.
मात्र तरीसुद्धा काही दारुविक्रेते चोरून लपून दारू विक्री करत असल्याची माहित पोलिसांना मिळताच आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. सतत सांगून सुद्धा दारू विक्री करणे बंद न केल्यामुळे आज दारुविक्रेत्याच्या दारुच्या डपक्या डोक्यावर ठेवून गावातून वरात काढण्यात आली. विशेष म्हणजे ठाणेदार घागे यांच्या कडून सतत सुरू असलेल्या कारवाईने पवनार गावातील वातावरण शांत झालेले आहे. महिला मंडळींनी याकरीता ठाणेदारांचे विशेष आभार व्यक्त केले आहे.