फेसबुक, इंस्टाग्राम भारतासह जगभरात अनेक ठिकाणी बंद ; नेटकरी आले ‘मेटा’कुटीला

शोशल मीडियातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या फेसबुक ही वेबसाईट मंगळवारी सायंकाळी काम करेनाशी झाली. अनेकांचे सुरू असलेले अकाउंट लॉगआऊट झाले आणि पासवर्ड टाकूनही ते उघडले नाहीत. त्यामुळे नेटकरी चांगलेच वैतागलेले पाहायला मिळाले.

फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन्ही सोशल मीडिया ऍप जगभरात बंद पडले आहेत. मेटा कंपनीतर्फे हे दोन्ही प्लॅटफॉर्म चालवले जातात. लोक वेबसाईट आणि अपवर लॉगईन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिथे त्यांना एरर येत आहे. तसंच त्यांना पोस्ट्स दिसत नाहीयेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here