वर्धा : सेलू तालुक्याच्या टाकळी (किटे) येथील धाम नदीच्या तीरावर कोंबड्यांची झुंज लावून हारजीतचा जुगार सुरू होता. याची माहिती सेलू पोलिसांना मिळताच सेलू पोलिसांनी धाड टाकून बारा जुगाऱ्यांना अटक केली तसेच त्यांच्याजवळील वाहनेही जप्त करण्यात आली. ही कारवाई रविवारी दुपारी ४:३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
शेख कलिम शेख यासीम (3५) रा. विकास चौक सेलू. दीपक पुरुषोत्तम सहारे (२५) रा. खुर्साबाद (गिरड), वासुदेव सुरेशराव बावणे (3८) रा. हिवरा, विजय गणेश शिंदे (२७) रा. विटाळा, रोशन कवडू वलके (२५) रा. टाकळी (किटे), समीर जयराम उर्ईके (४०) रा. आदर्श कॉलनी वर्धा, चंद्रदीपक र्षीलाल पवार (3०) रा. खडकी, अमरजित मुलासिंग बघेल (3४) रा. वानाडोंगरी, महेश रामलाल मसराम (७०) रा. टाकळी (किटे), लक्ष्मण मयूर कैकाडे (3८) रा. सातगाव, उमेश शालिक मेश्राम (४० रा. सातगाव, योगेश लक्ष्मण चिडाम (3९) रा. हिंगणा अशी अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एम.एच.3२ ए.इ.४०६3, एम.एच.३२ ए.यूइ४५६, एम.एच.3२ ए.व्ही.०४१७, एम.एच.3२ एच. ९०२९, एम’एच.३२ एयू. ८८२४ व आणखी विनाक्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली. याशिवाय पाच हजार रोख, दोन मृत तर पाच जिवंत कोंबडे, दोन चारचाकी वाहने, मोबाइल असा एकूण २१ लाख 3० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सेलूचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक प्रीतम निमगडे, गणेश राऊत, शरद इंगोले, ज्ञानदेव वणवे, राज तांबारे, अनिकेत कोल्हे व लोकेश पवनकर यांनी केली.