अल्लीपूर : गवंडी बांधकामासाठी एजंटकडून बनावट शिक्के तयार केले जात. आहे. अर्जावर ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नावे स्टॅम्पवर खोटे शिक्के मारले जात आहे. याची माहिती मिळताच ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी पोलिस ठाणे गाठले. त्यांनी या भोंगळ कारभाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी अल्लीपूर पोलिसांकडे केली आहे.
सदर बांधकाम कामगार हा कांचनगाव येथील मूळ रहिवासी आहे. त्याला एजंटने बनावट सही व शिक्क्याचा वापर करून अल्लीपूर येथील नागरिक दाखविले. कांचनगावसाठी अल्लीपूर येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांना स्वाक्षरी करण्याचा अधिकार नसताना, काही एजंटकडून बनावट स्टॅम्प तयार करण्यात आले. ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या नावाचा दरूपयोग करण्यात आला. त्यामुळे याच्याशी संबंधित नागरिक, एजंटवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांनी अल्लीपूर पोलिसांकडे केली आहे.