पवनार : दारुमुळे अनेकांचे जीव गेलेत, अनेक कुटूंब उध्वस्त झाले हे सर्वांनाच माहित आहे मात्र दारुबंदीसाठी विषेश प्रयत्न होताना दिसत नाही. एकट पोलिस प्रशासन दारुबंदी करु शकत नाही. अख्ख पोलिस ठाण जरी गावात आणून बसवल तरी ते शक्य होणार नाही. त्यासाठी ग्रामस्थांच्या मदतिची गरज आहे. सोबतच याबाबत जनजागृती करण्याचीही गरज आहे. आपन सहकार्य कराल तर पवनार गावातील दारुविक्री पूर्णपणे बंद करुन दाखवू असे प्रतिपादन ठाणेदार विनीत घागे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या दारुबंदीच्या विषेश सभेत बोलताना केले.
यावेळी सरपंच शालीनी आदमने, उपसरपंच राहुल पाटणकर, माजी पंचायत समीती सदस्य प्रमोद लाडे, सामाजीक कार्यक्रते नितीन कवाडे, भिम टायगर सेनेचे विशाल नगराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पूढे बोलताना ठाणेदार घागे म्हणाले की पोलिस प्रशासनाकडे केवळ दारु पकडने हेच एकमेव काम नाही. चोरीच्या घटना, मारामारीच्या घटना, गुन्ह्यांचा तपास करने, अशी अनेक कामे असतात त्यामुळे पूर्ण वेळ दारुबंदीकरता देणे शक्य नाही मात्र आपण पोलिस प्रशासनाला सहकार्य केले आणि आम्हाला दारुविक्रेत्यांची माहिती दिली तर त्यांच्यावर कठोर कारवायी करुन यापूढे दारुविक्रेते दारुविक्री करु शकणार नाही याचा बंदोबस्त आम्ही करु.
पवनार गावातील यूवा पिढी मोठ्या प्रमाणात दारुच्या आहारी गेल्याचे दिसून आले त्यामुळे सर्वात आधी आम्ही पवनार गावातील दारुविक्री बंद करण्यावर भर देत आहो. टप्प्याटप्याने सेवाग्राम पोलिस स्टेशनच्या हद्दीतील सर्व गावातील दारु हद्दपार करु तसेच दारुविक्रेत्यांची माहिती देणाऱ्यांचे नाव गुप्त ठेवून त्यांना सैरक्षण देण्याचीही हमी यावेळी ठाणेदार विनीत घागे यांनी ग्रामस्थांना दिली. सध्या दारुविक्रेत्यांवर होत असलेल्या कडक कारवाईमुळे गावात शांतता प्रस्थापीत होण्यास मदत झाली आहे. ग्रामथांनी याबद्दल सेवाग्राम पोलिसांच्या कामाचे कैतूक करीत समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी प्रमोद लाडे बोलताना म्हणाले की पोलिस प्रशासनाच्या आशिर्वादानेच दारुविक्रीला प्रोत्सान मिळते पोलिस प्रशासनाने मनावर घेतले तर दारुविक्री बंद व्हायला वेळ लागणार नाही. ठाणेदार श्री घागे यांनी पदभार स्विकारताच पवनार गावातील दारुविक्रेत्यांवर कठोर कारवायी केल्याने गावातील ९० टक्के दारुविक्री बंद झाली. याच प्रकारे पोलिस प्रशासनाने दारुविक्रेत्यांवर आपला वचक कायम ठेवला तर कोणताच दारुविक्रेता दारु विकण्याची हिम्मत करणार नाही असे ते म्हणाले. यावेळी पोलीस पाटील आम्रपाली ढोले, ग्रामपंचायत सदस्य राजू बावणे, जयंत गोमासे, सविता पेटकर, शारदा वाघमारे, राम मगर, राणी धाकतोड, यांच्यासह गावातील नागरिकांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.