वर्धा : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गोपयानिक आधारे कारवाई करून तब्बल चार तलवारी, पाच फरसे व , असा एकूण 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी दोघांविरुद्ध वर्धा शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे धारदार शस्त्रांची तस्करी करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. दुसऱ्याने काळोखाचा फायदा घेत घटना स्थळावरून यशस्वी पोबारा केला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची गुरूवारी रात्रीला वर्धा शहर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात गस्तीवर होती. दरम्यान काही तरुण मोठ्या प्रमाणात धारदार शस्त्र बाळगून त्याची विक्री करण्याच्या बेतात असल्याची माहीती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या चमूने बोरगार (मेघे)कडून अशोक नगरच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर नाकेबंदी करून दुचाकी थांबविली. पोलिसांनी अशोकनगर येथील शैलेश धर्मा नाडे (24) याला ताब्यात घेत त्याच्याकडून चार लोखंडी तलवारी, पाच मोठे फरसे, एक जुनी वापरती दुचाकी असा एकूण 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तर शैलेश नाडे याचा साथीदार राजा लोंढे रा. अशोकनगर हा काळोखाचा फायदा घेत पसार झाला. या प्रकरणी शहर ‘पोलिस ठाण्यात या दोन्ही शस्त्र तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.