पवनार : येथे दरवर्षी १२ फेब्रुवारीला महात्मा गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ धाम नदी तीरावर यात्रा भरते. या यात्रेचा आनंद घेण्याकरीता शहरातून तसेच ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात महिला व नागरिक येतात. या यात्रेत हजारोंच्या संखेने नागरीक येत असल्याने मोठी गर्दी उसळते याच संधीचा फायदा घेवून काही हुल्लडबाज यात्रेत येणाऱ्या महिला आणि मुलीची छेडखानी करीत असल्याची बाब येथील सामाजीक कार्यक्रते श्रीकांत तोटे, प्रशांत भोयर यांनी निदर्शनास आनून दिली. याची दखल घेत सेवाग्राम पोलीस स्टेशनचे नव्याने रुजू झालेले ठाणेदार विनीत घागे यांनी तगडा बंदोबस्त लावत हुल्लडबाजांचा बंदोबस्त केल्याने यात्रेकरुंना यात्रेचा आनंद लूटता आला.
दरवर्षी भरल्या जाणाऱ्या या यात्रेमध्ये हवसे गवसे येतात गर्दीचा फायदा घेत महिलांची छेड काढने, दागीने पळविने, शिविगाळ करने असे प्रकार घडत होते यावरून अनेक वाद निर्माण होवून कधी कधी तणावाची परिस्थिती सुद्धा निर्माण होत होती. मात्र यावर्षी सेवाग्राम पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला तसेच यात्रेत मध्यभागी फिरते पोलीस कर्मचारी, महिला कर्मचारी, वाहतूक कर्मचारी यांची नियूक्ती केल्याने हुल्लडबाजांना कुठलीच संधी मिळाली नाही. त्यामुळे यावर्षी संपूर्ण यात्रा शांत वातावरणात पार पडली असून यात्रेत सहभागी महिलांनी बंदोबस्त पाहुण ठाणेदार विनीत घागे यांचे आभार व्यक्त केले.