वर्धा : जिल्हा कृषि विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्था मर्यादीत वर्धा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सांवगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य अभियान अंतर्गत रोग निदान व आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर चे आयोजन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात तसेच आर्वी व हिंगणघाट येथे करण्यात आले होते.
वर्धा येथे आयोजित शिबिराला कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रभाकर शिवणकर, तर उद्घाटक म्हणुन डॉ. सचिन पावडे, तर प्रमुख उपस्थिती मध्ये कृषी उपसंचालक घाळतिलक, उपविभागीय कृषि अधिकारी सारीका ढुके, कार्यक्रम समन्वयक डॉ कातोरे, जि प चे कृषि अधिकारी बम्नोटे, पत संस्थेचे माजी अध्यक्ष अनंता तिमांडे, भास्कर मोघे, भाष्कर मेघे, अध्यक्ष प्रशांत भोयर ईत्यादी होते.
डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पुजन व हारार्पन, दिप प्रज्वलन करुन कार्यक्रम ची सुरवात करण्यात आली. यावेळी डॉ पावडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आरोग्य विषयी मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय मनोगतात शिवणकर यांनी शेतकरी व कर्मचारी हे आपल्या आरोग्यासाठी वेळ देत नाही म्हणून अश्या शिबीराचे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत पत संस्थेच्या उपक्रम ची प्रशंसा केली. शिबिरात शेतकरी, कृषि विभाग चे कर्मचारी, अधिकारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच कर्मचारी अधिकारी यांनी रक्तदान केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी कृषि विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्था चे संचालक मंडळ, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सांवगी येथील चमु, कृषि विभाग कर्मचारी, पत संस्थे चे व्यवस्थापक सुनिल देवलकर, अतुल सगणे, मंगेश किरणाके, इत्यादी नी केली. प्रास्ताविक कृषि उपसंचालक घाळतिळक यांनी संचालन मोहीन शेख यांनी तर आभार अध्यक्ष प्रशांत भोयर यांनी केले.