वर्धा : उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने धडक कारवाई करून दुचाकीने दारूची तस्करी होत असल्याचा प्रकार उघडकीस आणला. या कारवाईत पोलिसांनी 2.13 लाखांचा मुदेमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी बोरगाव (मेघे) भागातील पाण्याच्या टाकी परिसरात नाकेबंदी करून दुचाकीने येणाऱ्या एका अल्पवयीनासह रंजीतसिंग उपेंद्रसिंग धुरवाल याला ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील साहित्याची पाहणी केली असता त्यात मोठया प्रमाणात दारूसाठा आढळला. पोलिसांनी या दोघांपासून एम.एच. 32 आर 3180 क्रमांकाची दुचाकी व दारूसाठा, असा एकूण 98 हजार 100 रुपयांचा मुद्देमेल जप्त केला. नंतर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे हनुमाननगर परिसरात धडक कारवाई करून दुचाकीने वाहतूक केळेला दारूसाठा जप्त केला. या प्रकरणात पोलिसांनी वेदांत जितेंद्र गडकरी, पारीकेत विजय खडसे (दोन्ही रा. हनुमाननगर) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून एम.एच.32 सी. 3669 क्रमांकाची दुचाकी व दारूसाठा, असा एकूण 1 लाख 15 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही प्रकरणातील आरोपींवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी हा दारूसाठा नागपूर जिल्ह्यातून खरेदी करून तो वर्धेत आणल्याची कबुळी पोलिसांना दिली आहे.