पवनार : श्री भागवत सेवा समिती पवनारचे वतीने राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे ५५ वे पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शिवमहापुराणचे आयोजन ९ ते १७ डिसेंबरपर्यंत करण्यात आले असून १७ डिसेंबरला शोभायात्रा व महाप्रसादाने सांगता होणार आहे.
शुभारंभ प्रसंगी आमदार पंकज भोयर. आमदार रामदास आंबटकर, सरपंच शालिनी आदमाने, अभ्युदय मेघे, पुरुषोत्तम टोणपे, हरिभाऊ वझुरकर, सुनीता ढवळे, शुभम दांडेकर, प्रमोद लाडे, संदीप भांडवलकर, जगदी पेटकर, जगदीश वाघमारे उपस्थित राहणार असून १० डिसेंबरला आमदार अभिजित वंजारी यांचा सत्कार समारोह आयोजित करण्यात आला असून यादिवशी दत्ता मेघे मार्गदर्शन करणार आहे. गुणवंतांचा कौतुक सोहळ्याचे सुद्धा आयोजन करण्यात आले. शिवमहापुराण कथा बालयोगी सारंग चैतन्य महाराज करणार असून शुभारंभाचे कीर्तन लक्ष्मणदास काळे महाराज मोझरी हे सादर करतील. परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.