वर्धा : इलेक्ट्रिक वाहन प्रि-बुकोंगच्या नावावर व्हॉट्सअप लिंक पाठवून एक लाख 67 हजार 232 रुपयाची ऑनलाईन फसवणूक केली आहे. ही घटना सिंदी मेघे येथे सोमवारी घडली. याप्रकरणी कृष्णा रमेश ताटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायवर पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा नोंद करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कृष्णा ताटे यांना 10 नोव्हेंबर रोजी अनोळखी क्रमांकावरून मोबाइलवर कॉल आला. ‘सिम्पलवन’ या इलेक्ट्रिक वाहनाबाबत माहिती दिली माहिती योग्य वाटल्याने कृष्णा ताटे यांनी वाहन खरेदी करण्यासंदर्भात सकारात्मकता दाखविताच ताटे यांच्या व्हाट्सअँपवर लिंक पाठवून “प्रि-बुकोंग’ साठी नाममात्र शुल्क भरावयास सांगितले. ते भरल्यानंतर वेगवेगळी कारणे सांगत वाहन खरेदी करण्याच्या नावाखाली तब्बल एक लाख 67 हजार 232 रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.