

वर्धा : अमरावती-नागपूर या महत्त्वाच्या महामार्गावरील तळेगाव (श्या.पंत) या मध्यवती ठिकाणी सुसज्ज आरोग्य सुविधा मिळाव्या याकरिता शासकीय रुग्णालयाची मागणी होती. अखेर राज्य शासनाने याची दखल घेत ३०० खाटांच्या सुसज्ज रूग्णालयास मंजुरी प्रदान केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वोय सहायक तथा लोकसभा निवडणूक प्रमुख सुमित वानखेडे यांनी दिली. ही तळेगावकरांसाठी शासनाची आरोग्यदायी दिवाळी भेट ठरली आहे.
आर्वी विधानसभा. क्षेत्रातील महत्त्वाचे ठिकाण आहे. या महामार्गावर मोठा अपघात झाल्यास रुणाला वर्धा, अमरावती किंवा नागपूर येथे उपचाराकरिता दाखल करावे लागते. यामध्ये वेळ आणि पैसाही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. बरेचदा गंभीर जखमींना वेळीच उपचार न मिळाल्याने जीवही गमवावा लागतो. या परिसरात सुसज्ज आरोग्य सुविधेचा बॅकलॉग असल्याने स्थानिक नागरिकांनी तळेगाव येथे सुसज्ज शासकीय रूणालय व्हावे यासंदर्भात. लोकसभा निवडणूक प्रमुख यांना निवेदन दिले होते. त्यांनी याप्रकरणी शासनाकडे पाठपुरावा केला. अखेर गुरुवारी शासनाने तळेगाव येथे ३०० खाटांच्या शासकीय रुग्णालयास मान्यता दिल्य़ाने सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या रणालयाकरिता तळेगाव येथे महसूल विभागाची २५ एकर जमीन उपलब्ध असून, या जागेवर रुग्णाल्याची सुसज्ज इमारत तयार होणार आहे. वानखेडे यांच्या प्रयत्नाने नुकतोच आवी उपजिल्हा रूणालयासाठी १०० खाटांच्या आधुनिक सुविधांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यानंतर लगेच शासकीय रूणालयालाही शासनाने हिरवी झेंडी दिल्याने आर्वी, आष्टी, कारंजा या. तालुक्यांसह अमरावती व नागपूर जिल्ह्यातोलही तालुक्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे.