वर्धा : रेल्वेतिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या व्यक्तीला अटक बाबा अभिमान पाटील (51,रा. तळेगांव टालाटूले) असे अटक करण्यातआलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ‘स्लीपर क्लास’ची तत्काल तिकिट, आरक्षण फार्म, मोबाइल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेआरक्षण केंद्र वर्धा येथे तत्काळ तिकिटांची काळाबाजारी होत असल्याची माहिती रेल्वेपोलिसांना मिळाली होती. त्याआधारे निरीक्षक आखु शाखा नागपुर तसेच निरीक्षक आर.एस.मीना यांच्या मार्गदर्शनात एएसआय मुकेश राठौर, एएसआय विजय घोडेकर यांच्या सं पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी केली.
यात त्यांना एक व्यक्ती संशयीतरित्या ‘स्लीपर क्लास’ची तत्काळ तिकिट काढून घेऊन जाताना दिसून आला. चौकशी केली असता त्याच्याकडून एक तत्काळ तिकीट 2280 रूपये, पुढील दिवसाचा तत्काळ स्लिपर क्लास तिकीटासाठी भरलेला आरक्षण फार्म, एक रिकामा आरक्षण फार्म मिळून आला. या संदर्भात त्याला विचारपूस केली असता बाबा अभिमान पाटील असे नाव सांगण्यात आले.अवैधरित्या तिकीटाची काळाबाजारी करीत असल्याची कबुली दिली. प्रत्येक प्रवाशी तिकीटामाने 200 रुपये घेत असल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी रेल्वेपोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास रेल्वे पोलिस उपनिरीक्षक एस.डी.डिंगोळे करीत आहेत.