वर्धा : आर्वी हद्दीत अवैधधंद्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस पथकाने गांजा तस्करी करताना दोघांना रंगेहात अटक केली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आष्टी टी पॉईंट परिसरात ३१ रोजी रात्रीच्या सुमारास केली. दोघांकडून ९० हजार ५४० रुपयांचा गांजाही जप्त केला.
नामदेव गजानन गाखरे (४८ रा. सावळी बु), रामदास भरतराम घागरे (रा. शेलगाव उमाटे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तळेगाव हद्दीत गस्त घालत असताना आष्टी टी पॉईंट परिसरात दोघे गांजा विक्री करताना मिळून आले. पोलिसांनी छापा मारुन दोघांना अटक करीत त्यांच्या ताब्यातून १८ हजार २४० रुपये किंमतीचा ९१२ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल, दुचाकीसह गांजा विक्रीचे ११ हजार ३०० रुपये असा एकूण ९० हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप धोबे, पोलिस उपनिरीक्षक अमोल लगड, मनोज धात्रक, हमिद शेख, श्रीकांत खडसे, संजय बोगा, प्रदीप वाघ, विनोद कापसे, अभिलाष नाईक, अखिल इंगळे, दिनेश बोथकर, विशाल मडावी यांनी केली.