प्रेयसीला जाळून ठार मारणाऱ्या आरोपी प्रियकराला जन्मठेप

वर्धा : केवळ ६०० रुपयांची मागणी केल्यावर उद्भवलेला वाद विकोपाला जात प्रेयसीला प्रियकराने अंगावर रॉकेल टाकत आगीच्या हवाली करून जीवानिशी ठार केले. या प्रकरणातील आरोपीला वर्धा येथील जिल्हा सत्र न्यायालयाने दंडासह जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. सचिन उर्फ बंटी कृष्णराव पाचघरे रा. वर्धमनेरी ता. आर्वी असे शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव आहे. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी दिला.

ठोस पुरावे व साक्षदारांची साक्ष तसेच दोन्ही बाजूचा युक्तिवाद लक्षात घेऊन वर्धा येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. बी. शिंदे यांनी आरोपी सचिन उर्फ बंटी कृष्णराव पाचघरे याला भादंविच्या कलम ३०२ अन्वये आजीवन कारावास व ५० हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांच्या सश्रम कारावसाची शिक्षा ठोठावली आहे. तर मृताच्या दोन मुलांना नुकसान भरपाई म्हणून रूपये ४० हजार दंड रक्कमेतून समान रक्कम देण्याचे आदेशित केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here