सेलू : गावठी दारूची वाहतूक करणाऱ्यांविरोधात सेलू पोलिसांनी शनिवारी कोंबिंग ऑफरेशन राबविले. या मोहिमेअंतर्गत 13 जणांना अटक करण्यात आली. त्याच्या ताब्यातून घेतलेली 10 लाखांची गावठी दारू नष्ट करण्यात आली.
गावठी दारूसाठी कृप्रसीद्ध असणाऱ्या हिंगणी येथून वाहनातून दारूची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी घोराड मार्गावर छापा मारून पाच जणांना दारूसह अटक करण्यात आली. यात प्रफुल दिलीप दुधबडे ( वय 24) रा. खापरी(मु.) संतोष प्रेम छत्रे (वय 30) रा. कोतीबाडा सेलू, गजानन उर्फ गब्बर महादेव गव्हाळे (वय 40) रा. खापरी (मु.), मनोज पुरुषोत्तम पिंपळे, (वय 34) रा. शिवणगाव, प्रवीण वसंत मांढरे, (वय 33 ) रा. मटन मार्केट सेलू, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. त्याच्या कडून गावठी मोहा दारुसह 9 लाख 27 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कॉम्बिग मोहीमेदरम्यान दारूबंदी कायद्या अंतर्गत एकूण 9 प्रकरणता 13 जणांना अटक करून मुद्देमाल नष्ट करण्यात आला. कारवाई वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मारगदर्शनात ठाणेदार तिरुपती राणे पोलीस अंमलदार ज्ञानदेव वनवे, यांनी केली.