

वर्धा : शहरानजीकच्या म्हसाळा परिसरातील मनीषनगर परिसरातील घरात सुरू असलेल्या जुगार अड्यावर सेवाग्राम पोलिसांनी छापा मारून जुगार अड्डा उधळून लावला. पोलिसांनी सहा जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याकडील सहा दुचाकी, मोबाइलसह जुगारातील रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५९ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला. ही कारवाई २० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी अटक केलेल्यांत स्वप्निल रमेश लेवडीवार, रा. धंतोली, प्रशांत दादाराव वंजारी रा. वंजारी चौक, मंगेश महादेव चावरे रा. सावली सास्ताबाद, मोहन देविदास भोंगाडे रा. मदनी दिंदोडा, संतोष ज्ञानेश्वर वाघमारे रा. करंजी, स्वप्निल गुलाब लाड, रा. कुनघटकर लेआऊट, रा. मदनी यांचा समावेश आहे. म्हसाळा परिसरात असलेल्या मनीषनगर येथील एका घरात ताशपत्त्यांवर हारजितीचा जुगार सुरू असल्याची माहिती सेवाग्राम पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी २० रोजी मध्यरात्रीच्या सुमारास जुग्रार अहुधावर छापा मारला असता सहाही जुगारी जुगार खेळताना रंगेहाथ मिळून आले.
पोलिसांनी जुगाऱ्यांना अटक करून मोबाइल, रोख रक्कम तसेच एम.एच. ३२ एव्ही, ०९४५, एका विना क्रमांकाची दुचाकी, एम.एच. ३२ एक्यू. ५८५४, एम.एच, ३२ एए.७३३३७ क्रमांकाची बुलेट तसेच ७२ ताशपत्ते असा एकूण ५ लाख ५९ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक शिवराज कदम, संजय लोहकरे, मिलिंद राजपूत, विकास लोहकरे, संजय लाडे, संदीप मेढे यांनी केली.