वर्धा : टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनी ऑर्डर या संबंधीच्या तक्रारी तसेच डाक विभागाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारीचे सहा आठवड्याच्या आत निराकरण झाले नसेल किंवा समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारीचे निराकरण करण्यासाठी डाक अदालतीचे आयोजन दिनांक 26 सप्टेंबर रोजी अधीक्षक डाकघर कार्यालय, वर्धा येथे करण्यात आले आहे.
डाक अदालतीमध्ये आपली तक्रार मांडण्यासाठी तक्रारीच्या संपूर्ण तपशीलसह दिनांक 22 सप्टेंबर पर्यंत अधीक्षक, डाकघर वर्धा विभाग, वर्धा यांचे नावाने पाठवावी. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या तक्रारींचा विचार करण्यात येणार नाही तसेच डाक अदालतीसाठी तक्रारकर्त्यांनी स्वखर्चाने उपस्थित रहावे, असे डाक विभागातर्फे कळविण्यात आले आहे.