

वर्धा : नागपूर येथे नोकरीला असलेल्या व्यक्तीच्या घरी चोरट्यांनी संधी साधून 45 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. ही घटना सेवाग्राम पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या वरूड येथे उघडकीस आली. या प्रकरणी लोकेश सातपूते रा. वरूड यांनी दिलेल्या तक्रारी वरून सेवाग्राम पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.
माहितीनुसार लोकेश हे नागपूर येथे नोकरीला आहे. नेहमीप्रमाणे घराला कूलूप लावून ते नोकरीला गेले होते. दरम्यान चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूमध्ये असलेल्या कपाटात ठेऊन असलेले सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची अंगठी, सोन्याची नथ, दोन सोन्याचे बास्केट रिंग, सोन्याची चैन सोन्याचे लॉकिट असा एकूण एक लाख 97 हजार 915 रुपये किमतीचे 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने चोरट्यांनी लंपास केले. लोकेश घरी परत आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी लागलीच पोलिसांना घटनेची सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठ पंचनामा करून चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला