

पवनार : येथील नागटेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे काम ‘तपोवन’ बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्थेकडून चालू करण्यात आलेले आहे. संस्थेचे माध्यमातून या वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपण मोहिमेत बहुसंख्य हात संस्थेची मदत करण्याकरीता सरसावले आहे. आठोड्यातील प्रत्येक रविवारी नागटेकडी परिसरात वृक्षलागवड आणि संगोपणाचे काम श्रमदानाच्या माध्यमातून बहुसंख्य हात एकत्र येत संस्थेच्या कार्याला मदत करीत आहे. संस्थेचे हे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
विकासाच्या नावाखाली माणसांकडून बेसूमार झाडांची कत्तल केली जात आहे. याचाच परिणाम निसर्गसाखळीवर झालेला आहे. परिणामी वातावरणात सातत्याने बदल होत आहे. तापमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पशू-पक्षी दिसेनासे होत चाललेले आहे. याचा परिणाम माणवी जीवणावर होताना दिसत आहे. ही बाब लक्षा घेत तपोवन बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवडीची मोहिम राबविण्यात येत आहे. पवनार येथील नागगटेकडी परिसरात भविष्यात हजारोच्या संखेने फळझाडे संस्थेच्या माध्यमातून लावल्या जाणार आहे. या सर्व झाडांचे संगोपणही करण्यात येणार आहे. काही दिवसातच परिसर बहरणार आहे. त्यातून वन्य प्राणी, पशु पक्षी यांची भूक भागण्यास मदत होणार आहे.
वृक्षारोपणाकरीता संस्थेला सर्व स्थरातून मदत मिळत आहे. सामाजीक कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच सामान्य नागरीकांनीही या कार्यात सहभाग घेतला आहे. अनेक दानदाते या कामाकरीता संस्थेला मदत करीत आहे. काही दानदात्याकडून झाडे तर काहींकडून ट्रिगार्ड देण्यात येत आहे. संस्थेकडून वृक्षारोपणाचे कार्य अविरतपणे चालू राहण्याकरीता अनेक दानदात्यांनी संस्थेला झाडांसह ट्रिगार्ड देवून मदत करावी असे आवाहन संस्थेकडून करण्यात येत आहे. वृक्षारोपणाकरीता ‘तपोवन’ बहुउद्देशिय ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष राहुल खोब्रागडे, सदस्य सुनील साठोने, गणेश मसराम, पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, बजरंगदलाचे जिल्हा संयोजक बबलू राऊत, सामाजीक कार्यकर्ते श्रीकांत तोटे, नितीन कवाडे, कृषि पर्यवेक्षक प्रशांत भोयर, ग्रामपंचायत सदस्य मनिष ठाकरे, राहुल काशीकर, अनिकेत मुंगले, नरेश बावने, गोविंद मुंगले, वैष्णव गायकवाड, अनिल मुंगले, राजू यांनी सहकार्य केले.