दुचाकीच्या अपघात 1 ठार, 1 गंभीर! हिंगणघाट उमरेड मार्गावरील घटना

वर्धा : भरधाव वेगात समुद्रपूर येथे जात असलेली दुचाकी हिंगणघाट उमरेड मार्गावरील धोंडगाव जवळील वळण मार्गावर अनियंत्रित होऊन अपघात ग्रस्त झाली. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांपैकी एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला दुसरा गंभीर जखमी, तर तिसरा किरकोळ जखमी आहे. अंकित बाबाराव सातघरे (27) रा देवरवाडा असे मृत युवकाचे नाव आहे.

अंकित बाबाराव सातघरे (27), रा देवरवाडा तालुका भद्राबती, हा एमएच 29 एपी 9763 क्रमांकाच्या दुचाकी ने गिरड कडून समुद्रपूरच्या दिशेने जात होता. त्याच्या बरोबर त्याचा मित्र अतुल सुगे व अन्य अशे तीघे जण दुचाकीवरून प्रवास करित होते. दरम्यान धोंडगाव समोरील वळण रस्त्यावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी मार्गाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या लोखंडी कठड्याला जाऊन धडकली. या अपघातात अतुल सुगे व अंकित सातघरे याचे डोक्याला जबर मार लागल्याने ते जखमी झाले. अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वी अंकित सातघरे यास मृत्यू घोषित केले या प्रकरणी पोलिसात अपघाताचा गुन्हा नोद करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here