पवनार : महाराष्ट्र राज्य ग्रंथाथालय संघाच्या वतीने मंगळवारी (ता. २५) राज्यस्तरीय ग्रंथालय पदाधिकारी, कार्यकर्ता यांचा विनोबा भावे याच्या आश्रमातून पवनार ते वर्धा जिल्हाधिकारी कार्यालय पदयात्रा वारीने ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यात आलेय. या पदयात्रेत राज्यभरातून शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आचार्य विनोबा भावे यांच्या समाधी स्थळापासून निघालेला मोर्चा पवनार येथून वर्धेपर्यंत नऊ किलोमीटर पायदळ यात्रा काढुन जिल्हाधिकारी कार्यालयात पदयात्रा करुन मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ग्रंथालयांना अनुदान वाढ, कर्पचाऱ्यांना वेतनश्रेणी व सेवाशाश्वती, ग्रंथालयाचे वर्ष बदल, उच्च विद्याविभूषित कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या मागण्या गांधी- विनोबांच्या नगरीत अहिंसात्मक मार्गाने शासनापर्यंत पोचविण्यासाठी हे अभिनव वारी पदयात्रा आंदोलन करण्यात आले.
आपली लढाई आपणच लढू या, चला शांती अहिंसेने वारी काढूया असे नारे शांततेने देत ही पदयात्रा निघणार आहे. आंदोलनाची सुरुवात मंगळवारी विनोबा भावे आश्रम, पवनार येथून सकाळी ११ वाजता झाली. राज्य शासनाकडून प्रलंबित ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक व्हावी याकरिता महाराष्ट्र ग्रंथालय चळवळीमधील पदाधिकारी, कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन केले.