

वर्धा : सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी आज जिल्ह्यातील समृध्दी महामार्गाची पाहणी केली. महामार्गावर वर्धा शहरानजीक येळाकेळी जवळ श्री.भुसे यांनी थांबून पाहणी केली व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, समृद्धी महामार्ग प्राधिकरणाचे सहव्यवस्थापकीय संचालक ए.बी.गायकवाड, संजय यादव, ए.एस.मुरडे, मुख्य महाव्यवस्थापक भारत बस्तेवाड, मुख्य अभियंता एस.के.सुरवसे, उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, भुषण मालखंडारे आदी उपस्थित होते.
श्री. भुसे यांनी नागपुर येथील महामार्गावरील पहिल्या टोलप्लाझापासून पाहणी सुरुवात केली. तेथे काही वेळ थांबल्यानंतर त्यांनी वर्धा जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्यातील मार्गाची पाहणी करत येळाकेळी जवळ आल्यावर त्यांनी तेथे काही काळ अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली व संवाद साधला. याठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. वर्धा जिल्ह्यात समृध्दीची 58 किलोमीटर इतकी लांबी आहे. येळाकेळी येथून ते पुढील जिल्ह्याकडे रवाना झाले.