देवळी : यशोदा नदीच्या वळण रस्त्यावरून जात असलेला टिप्पर अचानक रस्त्याकडेला उलटला. अपघातात टिप्परची केबिन जमा झाल्याने टिप्पर चालक व क्लिनर थोडक्यात बचावले. हा अपघात यशोदा नदी वळण रस्त्यावर गुरुवारी २९ रोजी झाला गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अनिकेत निखाडे याच्या मालकीचा एमएच ३६ एफ १८११ क्रमांकाचा टिप्पर चालक गणेश इरपाचे व त्याचा सहकारी औद्योगिक वसाहतीतील महालक्ष्मी टीएमटी स्टील कारखान्यातून वेस्ट मटेरिअल घेऊन इसापूरकडे जात होते. दरम्यान यशोदा नदीच्या वळण सस्त्यावग अचानक टिप्पर उलटल्याने क्षतीग्रस्त होऊन टिप्परची केबिन एका जागी जमा झाली. दरम्यान चालक गणेश इरपाचे, रा. पाचगाव व त्याचा सहकारी दबल्याने थोडक्यात बचावले.