आषाढी एकादशीच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला कारची धडक! जखमीवर सेवाग्रामात उपचार सुरू

समुद्रपूर : चंद्रपूर राज्य मार्गावरील नारायणपूर (झोटिंग) येथे सकाळी आषाढी एकादशीनिमित्त यात्रेला जात असताना नारायणपूर पाटीजवळ वळण घेताना भरधाव कारचालकाने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक सासरा जागीच ठार झाला तर सुनेसह दोन नातू गंभीर जखमी आहे. घटनेनंतर कारचालक फरार झाला असून जखमींना सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हरिभाऊ किसना बोबडे रा. किन्हाळा, असे मृताचे नाव आहे. ते सून मीना प्रवीण बोबडे (२९), नातू वेग प्रवीण बोबडे (६) आणि दीड वर्षाचा चैतन्य बोबडे यांना घेऊन एम.एच.३२.डब्लू ७४४५ क्रमांकाच्या दुचाकीने नारायणपूर (झोटिंग) येथे यात्रेला जाण्यासाठी निघाले. नारायणपूर पाटीजवळ वळण घेत असताना चंदपूरकडून नागपूरकडे जाणाऱ्या एम.एच.३३ व्ही. ८९९६ क्रमांकाच्या भरधाव कारने जबर धडक दिली. या धडकेत हरिभाऊ बोबडे हे जागीच ठार झाले तर सुनेसह दोन्ही नातू गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग मदत केंद्राचे पोलिस आणि समुद्रपूरचे पोलिस उपनिरीक्षक अपेक्षा मेश्राम आणि गंगाधर भोकरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतक आणि जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गंभीर असलेल्या सुनेसह नातवांना सेवाग्राममध्ये हलविण्यात
आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून कारचालक घटनेनंतर फरार झाला. पुढील तपास समुद्रपूर पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here