

पवनार : चला जाणूया नदीला अभियानांतर्गत नद्या स्वच्छ, सुंदर व अमृत वाहिन्या करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या अभियानात जिल्ह्यातील धाम, वणा व यशोदा या तीन नदींचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानाअंतर्गत मंगळवार (ता. २७) पवनार येथील धाम नदी स्वच्छता मोहिम राबविण्यात आले. यात जिल्हा प्रशासनासह सर्व सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत नदीपात्रात स्वच्छता मोहिम राबविली.
पवनार येथील धाम नदी ही वर्धा शहरासह परिसरातील उद्योगंना पाणी देतेे ही नदी जिल्ह्यासाठी एकप्रकारे लोकमाताच ठरलेली आहे. मात्र या नदीमध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे धाम नदीचे जल अस्तित्व धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या व जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेत धाम नदी स्वछता अभियान राबवीले. यावेळी पवनार येथील धाम नदीमध्ये साचलेला कचरा काढून प्रदुषण मुक्त केले.
या अभियानात जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, वर्ध्याचे तहसिलदार रमेश कोळपे, सरपंच शालीनी आदमने, उपसरपंच राहुल पाटणकर, गटविकास अधिकारी पंचायत समीती शशिकांत शिंदे, ग्रामविकास अधिकारी श्री डमाळे, पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे, तलाठी प्रशांत भोयर, मंडळ अधिकार, प्रविन हाडे, ग्रामपंचायत सदस्य राम मगर, मोरेश्वर हुलके, राजू बावने, डॉ. सचिन पावडे, श्याम भेंडे, ग्रामपंचायत कर्मचारी राजू उराडे, देविदास गुरनुले, गणेश मसराम, किशोर देवताळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना, जिल्हा प्रशासन वर्धा, वैद्यकीय जन जागृती मंच वर्धा यांनी सहभाग नोंदविला होता.
जिल्हाधिकाऱ्यांनी विनोबांच्या समाधीस्थळाचे घेतले दर्शन
यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी पवनार येथील आचार्य विनोबा भावे आश्रमला भेट दिली. जेष्ठ गांधी-विनोबा विचारक गैतम बजाज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आश्रमाची माहिती दिली. या परिसरात असलेल्या ऐतिहासीक दगडांच्या मुर्तींविषयी सविस्तर चर्चा केली जाणून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी विनोबांच्या समाधीस्थळाचे दर्शनही यावेळी घेतले