वर्धा, ता. १९ : कृषि विभाग कर्मचारी वृंद सहकारी पतसंस्थच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये प्रशांत भोयर यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलनी १५ पैकी १५ जागा जिंकून एकता पँनलचा धुव्वा उडविला. विविध मुद्यांवर ही निवडणूक गाजली होती.
वयक्तिक टिका टिप्पणी, प्रचाराचा घाणेरडा प्रकार हे विरोधी पॅनलला महागात पडले. भ्रष्टाचारमुक्त पतसंस्था, पॅनल मधील उमेदवारांनी केलेले कार्य यामुळे विजयी पॅनलला एक हाती सत्ता मिळवायला मदत मिळाली. तसेच जाहीरनाम्यामधील मुद्द्यामुळे मतदार भारावून गेले होते.
विजयी उमेदवारमध्ये विमुक्त जाती जमाती या गटातुन ललीता राठोड, अनुसूचित जाती/ जमाती गटातुन जितेन्द रामटेके, इतर मागासवर्गीय गटातुन विजय खोडे, महीला गटातून जयश्री जायदे, सुचीता रायपुरे तर सर्वसाधारण गटातुन प्रशांत भोयर, मोहीन शेख, विनेश थोरात, दिपक घुगे, सुभाष राठोड, अविनाश भागवत, सचिन जाधव, राहुल देशमुख, गणेश पिवळटकर, सुचिता सलाम हे विजयी झाले. विजयासाठी कार्यरत कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी संस्थेचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक भाष्कर मोघे, अनंत तिमांडे, संजय ठाकरे यांनी सर्वाचे अभिनंदन केले.